आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने बळजबरीने मुलीला परत आणले (व्हिडिओ सह)
बिहार- मुलीने केलेला आंतरजातीय प्रेमविवाह मान्य नसलेल्या कुटुंबाने सासरी जाऊन मुलीला दुचाकीवर बसवून बळजबरी घरी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सासरच्या मंडळींनी माहेरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. या व्हिडिओत 2 तरूण मुलीला बाईकवर बळजबरी बसवताना दिसत आहेत. यावेळी मुलगी रडते. याआधी मुलीच्या कुटुंबाने मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती. ज्यात मुलाच्या वडिलांचा हात फॅक्चर झाला.