March 1, 2024
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

मध्यरात्रीपर्यंत हॉटेल सुरू ठेवल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल

पिंपरी स्टेशन येथील हॉटेल कुणाल रेस्टॉरंट बार या हॉटेलच्या मालकावर मध्यरात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमध्ये पेटत्या शेगडीच्या बाजूला भरलेले गॅस सिलेंडर ठेवल्याचेही समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि. 4) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली.

सनी परमानंद सुखेजा (वय 33, रा. पिंपरी (Pimpri ), सरफराज मोहम्मद अली (वय 35, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक सिद्राम बाबा यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पोलीस नाईक कुऱ्हाडे हे पिंपरी मार्शल ड्युटीवर असताना पिंपरी रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या कुणाल हॉटेलमध्ये त्यांना पेटत्या शेगडीच्या बाजूला तीन गॅस सिलेंडर आढळून आले. हॉटेलमध्ये मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास दोन ग्राहक जेवण करीत होते. दोघेजण जेवण करण्यासाठी आले होते. हेल्पर वेटर आणि आचारी असे आणखी तिघेजण हॉटेलमध्ये होते.

हॉटेल मालकाने हॉटेलमधील लोकांची कोणतीही आरोग्य विषयक काळजी घेतली नाही, तसेच गॅस हा ज्वालाग्रही पदार्थ असतानाही त्याच्या बाजूला पेटती शेगडी ठेवली ही बाब गंभीर आहे तसेच हॉटेल नियमित वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

फेरीवाल्या आईच्या मुलाने केले एव्हरेस्ट शिखर सर

pcnews24

निगडी:तथाकथित भाईंची (कोयता गँग) पोलिसांकडून काढली धिंड.

pcnews24

मोटार सायकल चोरणारी दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात.१५ मोटारसायकली जप्त

pcnews24

फेक इंस्टाग्राम अकाउंटवरून महिलेस ब्लॅकमेल

pcnews24

पुणे:पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली !!

pcnews24

पुणे:कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांचे धागेदोरे रत्नागिरीपर्यंत; इंजिनीअर आरोपी अटकेत.

pcnews24

Leave a Comment