RBI ची आज महत्त्वाची बैठक
आजपासून RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. मागच्या बैठकीवेळी महागाई नियंत्रणात येत असल्याने RBI ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. अशात पुन्हा एकदा आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याची शक्यता आहे. महागाई दर RBI च्या टॉलरन्स बँडमध्ये असल्याने ईएमआयमध्ये कोणतीही वाढ बघायला मिळणार नाही असे संकेत दिले आहेत. सध्या रेपो रेट 6.50 टक्के आहे तर महागाई दर 5 टक्क्यांखाली आहे.