टॉप 10 च्या यादीतून महाराष्ट्र बाहेर
देशभरातील शैक्षणिक संस्था, विद्यापीठांचे रँकिंग हे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहे. यात देशातील सर्वोत्तम टॉप 10 विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाला स्थान मिळालेले नाही. मुंबई आयआयटीनं देशातील इंजिनिअरिंग शिक्षण संस्थांच्या यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे, तर देशातील दंत महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर आहे.