माथेरानमध्ये टॉय ट्रेन रुळावरून घसरली
महाराष्ट्रातील लोकप्रिय माथेरान हिल स्टेशनवरून नेरळला जाणारी टॉय ट्रेन मंगळवारी रुळावरून घसरली. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मुंबईपासून सुमारे 95 किमी अंतरावर असलेल्या जुम्मा पट्टी स्थानकाजवळ रेल्वेच्या इंजिनचे चाक रुळावरून घसरल्याने ही घटना घडली. रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबत आज माहिती दिली आहे. या टॉय ट्रेनमध्ये 90 ते 95 प्रवासी होते.