रायगडावर पोलिसांचा लाठीचार्ज
किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याला शिवप्रेमींनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. सकाळी 12 नंतर येथील सोहळा संपला. त्यानंतर ही मोठी गर्दी गडावरुन उतरु लागली होती. यावेळी पोलिसांनी या ठिकाणी काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शिवप्रेमीवर लाठीचार्ज करत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.