महाराष्ट्र: शिंदे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार -तानाजी सावंत
राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) लोकसभेची निवडणूक एकत्र लढवणार आहेत. त्यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत केली आहे. मात्र जागावाटपावरून दोन्ही पक्षात थोडे मतभेद असल्याचे दिसून येत आहेत. राज्याचे मंत्री तानाजी सावंत यांनी शिंदे गट 23 लोकसभेच्या जागा लढवणार, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वेळी आम्ही 23 जागा लढवून 18 जागांवर विजय मिळवला होता, असेही त्यांनी सांगितले.