महाराष्ट्र :”अजित पवार लोकं तुम्हाला जोड्याने मारतील ” – गोपीचंद पडळकर
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात, तर लोकं आता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत’ असे ते बीडमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अरे तुरेची भाषा करत शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती.