September 23, 2023
PC News24
राजकारण

काँग्रेसच्या युवक व क्रीडा विभाग प्रदेश अध्यक्षपदी समिता गोरे यांची नियुक्ती.

काँग्रेसच्या युवक व क्रीडा विभाग प्रदेश अध्यक्षपदी समिता गोरे यांची नियुक्ती.
काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समिता राजेंद्र गोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत युवक व क्रीडा सेलच्या प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी समिता गोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
समिता गोरे या पिंपरी चिंचवड व पुणे परिसरात उल्लेखनीय सामाजिक कार्य करत आहेत, महिला तसेच तरुणांना रोजगार प्रशिक्षण देऊन व्यवसायात संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात, त्या स्वतः राष्ट्रीय खेळाडू व पिस्टल शूटिंग प्रशिक्षक असून आहार विषयामध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने सर्वसामान्यांच्या विविध अडचणी सोडविण्यास प्राधान्य देतात. कोरोना काळातही त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध माध्यमातून सहकार्य केले होते.

समिता गोरे यांची काँग्रेस युवक व क्रीडा विभाग प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने पिंपरी चिंचवड शहरातही काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Related posts

शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं

pcnews24

फडणवीसांच्या सांगण्यावरून सामिल झालो – बच्चू कडू

pcnews24

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

pcnews24

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज.

pcnews24

‘कोकणातील जमीनी विकू नका’ –  राज ठाकरे 

pcnews24

महाराष्ट्र:राजीनाम्याचा अंतिम निर्णय शरद पवार यांच्याशी बोलूनच -डॉ. अमोल कोल्हे

pcnews24

Leave a Comment