‘रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य’ : एच.डी.देवेगौडा.
ओडिशा रेल्वे अपघाताप्रकरणी 12 विरोधी पक्षांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी वैष्णव यांना राजीनामा मागणे योग्य नाही, असे म्हटले. ‘रेल्वेमंत्री नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व आवश्यक निर्णय घेत आहेत, ते सलग काम करत आहेत, अशा परिस्थितीत त्यांचा राजीनामा मागणे बुद्धीला पटण्यासारखे नाही,’ असे देवेगौडा यांनी म्हटले आहे..