अज्ञात चोरट्यांनी कंपनीसमोर पार्क केलेल्या ट्रकमधून केली एक लाखांची चोरी
चिंचवड,एक्साईड बॅटरी कंपनी समोर शंकरनगर येथे पार्क केलेल्या ट्रक मधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 2 जून रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली.
सुनील अशोक थोरात (वय 23, रा.परभणी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यांनी त्यांचा ट्रक (एमएच 12/टीव्ही 9914) एक्साईड बॅटरी कंपनी समोर 1 जून रोजी रात्री दहा वाजता पार्क केला. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रकमधील 98 हजार 600 रुपये किमतीच्या 18 ॲल्युमिनियमच्या लीड चोरी करून नेल्या.
त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.