मुंबई:सीएसटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉर्ट सर्किट
मुंबईतील सीएसटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळित झाली आहे. जुईनगर आणि नेरूळ स्थानकांच्या दरम्यान सीएसटीकडे जाणाऱ्या रुळावर शॉर्ट सर्किट सारखा प्रकार घडला आहे, आणि त्यातून काही वेळासाठी मोठी आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व गाड्या नेरूळ मध्येच ठप्प आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे.