अभिनंदन सुनील ! भारताने जिंकले सुवर्णपदक
दक्षिण कोरियातील येचियोनमध्ये सुरु असलेल्या आशियाई अंडर 20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये मंगळवारी पुरुष डीकॅथलॉन इव्हेंटमध्ये भारताने सुवर्णपदक जिंकले. भारताच्या 19 वर्षीय सुनील कुमारने ही कमाल केली आहे. त्याने 10 क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या डीकॅथलॉनमध्ये 7003 पॉइंट्स मिळवून पहिले स्थान प्राप्त केले आहे. सुनीलने 100 मीटर अडथळ्यांची शर्यत, चक्का फेक आणि भाला फेक यामध्ये अव्वलस्थान मिळवले आहे.