‘एमटीएनएलला बंद करु शकते सरकार’
केंद्र सरकार दूरसंचार ऑपरेटर महानगर टेलिफोन निगम लिमिटेडला (एमटीएनएल) बंद करण्याच्या योजनेवर विचार करत असल्याचे वृत्त आहे. ही कंपनी सध्या कर्जाच्या विळख्यात अडकली आहे. पण एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही. सर्व कर्मचारी आणि सर्व कारभार सरकारकडून बीएसएनएलकडे सोपवला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान एमटीएनएलवर जवळपास 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.