कुस्तीपटू अनुराग ठाकूरांच्या निवासस्थानी
क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी चर्चा करण्यासाठी बोलावल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक दिल्लीतल्या ठाकूर यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. साक्षीसोबत तिचा पतीही या बैठकीत सामील झाला आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत कुस्तीपटूंनी गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरु केले आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.