१०जून पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजन बैठक-पोलीस मित्र,विशेष पोलीस अधिकारी, प्राधिकरण नागरी सुरक्षा इ. चा सहभाग
जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या ३३८ वा पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे होणारे प्रस्थान हे मागील वर्षापेक्षा १० दिवस अगोदरच होत आहे.
याकरिता प्रशासन व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती,सामाजिक संस्थांनी वारीतील वैष्णवांच्या सेवेकरता तत्पर रहाणे आवश्यक आहे.त्या नियोजनाचा भाग म्हणून दि.६ जून २०२३ रोजी पोलीस मित्र,विशेष पोलीस अधिकारी,समिती विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी यांची विशेष बैठक देहूरोड पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.
१० जून रोजी येणाऱ्या जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर सूर्यवंशी बैठकीस उपस्थित होते.
या प्रसंगी समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” पालखीची सुरक्षा करण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य व इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या वारकरी भक्तांची सेवाभावी मदत करण्यासाठी समितीचे १२० सदस्य यंदाच्या वर्षी पूर्ण पालखी सोहळ्यात सहभागी असणार आहेत.
ह्यावर्षीच्या वाढत्या कडक उन्हाची शक्यता गृहित धरून समितीने पांढऱ्या रंगाच्या टोप्या, सुती उपरणे यांचे वाटप करण्याचे नियोजन केले आहे.
या बैठकीस एल आय बी विभागाचे अजित सावंत, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय पाटील, राज्य संपर्क प्रमुख विजय मुनोत, निगडी देहूरोड विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, आकुर्डी गंगानगर प्रमुख संतोष चव्हाण,पुणे विभागीय प्रमुख नाना कुंबरे, जयेंद्र मकवाना,
सुनिल सुतार,राहुल जाधव, संदीप जाधव, राजू निबुदे,प्रविण जोंधळे,राहुल लुगडे हे उपस्थित होते.बैठकीचे नियोजन एल आय बी चे सावंत यांनी केले.
प्रास्ताविक विजय मुनोत यांनी व सूत्रसंचालन विशाल शेवाळे यांनी केले. नाना कुबरे यांनी आभार मानले.