आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या ६ जणांना अटक
कोल्हापुरात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या ६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक दिनी काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी आज मोठा मोर्चाही काढला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. दरम्यान आज मोर्चा काढणाऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आहे. तसेच अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
‘कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घालणार नाही’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नये, कायदा हातात घेणाऱ्यांना पाठिशी घालणार नाही, शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम गृहविभागाचे आहे, असे शिंदे यांनी म्हटले. दरम्यान काही तरुणांनी औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आज काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.