निवृत्तीनाथ पालखीचा पहिला रिंगण सोहळा दातलीत
टाळ-मृदंगाच्या गजरात नाशिकच्या सिन्नरच्या दातली येथे खंबाळे रस्त्यालगत आज संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा पार पडला. झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला या क्रमाने सर्वजण रिंगणातून धावले. तसेच मानाच्या अश्वाने पालखीसोबत प्रदक्षिणा पूर्ण केली. रिंगण संपल्यानंतर हमामा, फुगडी, हुतुतू, आट्या-पाट्या हे खेळ खेळण्यात आले.