March 1, 2024
PC News24
आरोग्यगुन्हा

अंमली पदार्थ विरोधी पथकाने 31 किलो गांजा पकडला

अंमली पदार्थ विरोधी पथकाने 31 किलो गांजा पकडला

मंगळवार (दि.6) गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने 31 किलो गांजा पकडला. या गांजा विक्री प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

संजय मोहन शिंदे (वय 36, रा. नेहरूनगर, भोसरी एमआयडीसी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यासह सुरज झंजाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गावठाणातील लक्ष्मीपुर्ती चाळीत एकाने गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून संजय शिंदे याला ताब्यात घेतले. त्याच्या खोलीतून 31 किलो 268 ग्राम वजनाचा सात लाख 81 हजार 700 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला.

हा गांजा त्याने सुरज झंजाळ याच्याकडून आणला असल्याचे सांगितल्याने त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts

“अनफिट” वाहनांना प्रवेश नाकारला,समृद्धी महामार्गाच्या अतिवेगावर आता करडी नजर.

pcnews24

सईचा ड्रायव्हर सद्दाम याला मारहाण.

pcnews24

दुबईच्या नोकरी आमिषाने 70 हजाराची फसवणूक

pcnews24

लैंगिक शोषण,खंडणी आणि बेकायदेशीर फसवणूक प्रकरणी एकाला अटक..डीएसटी टीम भरतपूर पोलिसांची कारवाई

pcnews24

युट्युब चॅनल टास्क सबस्क्राईबच्या बहाण्याने 76 लाखाला गंडा.

pcnews24

मनोरुग्ण महिलेवर बलात्काराची गंभीर घटना

pcnews24

Leave a Comment