March 1, 2024
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

चिंचवड:सरकारी कामाच्या टेंडर बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

चिंचवड:सरकारी कामाच्या टेंडर बहाण्याने महिलेची 25 लाखांची फसवणूक

सरकारी कामाचे टेंडर मिळवून देतो व भिशीमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेकडून लाखो रुपये वसूल केले. पण कोणतेही टेंडर न देता महिलेची 25 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 6) फिर्याद दिली आहे.हा प्रकार 10 डिसेंबर 2018 ते 10 फेब्रुवारी 2020 या कालावधीत थेरगाव येथे घडला असून याप्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परमेश्वर उर्फ प्रमोद नागनाथ सूर्यवंशी (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला सरकारी कामाचे टेंडर मिळवून देतो आणि त्याद्वारे चांगला परतावा देतो असे आमिष दाखवले. 2018 ते 2020 या कालावधीत आरोपींनी फिर्यादीकडून रोख आणि ऑनलाईन स्वरुपात 23 लाख 10 हजार रुपये घेतले. त्यानंतर भिशीमध्ये चांगला परतावा देतो म्हणून आणखी दोन लाख 40 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस कोणताही मोबदला, सरकारी टेंडर मिळवून न देता तसेच घेतलेले पैसे परत न करता महिलेची 25 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Related posts

सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल,महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्था प्रकल्पातील घटना.

pcnews24

एमआयडीसी भोसरी डीपी रोडवरील बाधित व्यावसायीकांना चऱ्होली गावात जागा

pcnews24

पिंपरी चिंचवड:शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा राजीनामा द्या.

pcnews24

‘Life story’ दर्शना पवारचा व्हिडिओ व्हायरल.

pcnews24

पुणे बिझनेस स्कूल ‘इंडिया एक्सलन्स अवाॅर्ड’ ने सन्मानित.

pcnews24

संभाजीनगर,चिंचवड:बालविवाह प्रकरणी मुलीच्या पालकांवर गुन्हा

pcnews24

Leave a Comment