September 28, 2023
PC News24
गुन्हापिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड: सहाय्यक उद्यान निरीक्षकास रंगेहात अटक.कामाचे बिल मंजूर करताना घेतली लाच.

पिंपरी चिंचवड: सहाय्यक उद्यान निरीक्षकास रंगेहात अटक.कामाचे बिल मंजूर करताना घेतली लाच

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहाय्यक उद्यान निरीक्षकाने कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजारांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सहाय्यक उद्यान निरीक्षकास लाच घेत असताना रंगेहात पकडले. बुधवारी (दि.7) नेहरूनगर येथील उद्यान विभागाच्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.याप्रकरणी 47 वर्षीय कंत्राटदाराने एसीबीकडे तक्रार केली असता किरण अर्जुन मांजरे (वय 46) या सहाय्यक उद्यान निरीक्षकास रंगेहात पकडले.

एसीबी यांनी दिलेल्या महितीनुसार तक्रारदार हे कंत्राटदार आहेत त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यानामध्ये देखभालीचे काम घेतले होते. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी सहाय्यक उद्यान निरीक्षक मांजरे यांनी 17 हजार रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने बुधवारी दुपारी नेहरूनगर येथील उद्यान विभागाच्या कार्यालयात सापळा लावला. सहाय्यक उद्यान निरीक्षक मांजरे यांना 17 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Related posts

महानगरपालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन..

pcnews24

निघोजे महाळुंगे रोडवर कंटेनर चालकाला मारहाण दोघांना अटक.

pcnews24

मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका’ नक्की काय प्रकार आहे ?

pcnews24

संभाजीनगर,चिंचवड:बालविवाह प्रकरणी मुलीच्या पालकांवर गुन्हा

pcnews24

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ

pcnews24

पिंपरी: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जिवे मारण्याचा प्रयत्न… पतीला अटक

pcnews24

Leave a Comment