हिंजवडी: जीवे मारण्याची धमकी देत महिलेचे फोटो व्हायरल करत बदनामी
फोनवर बोलणे बंद केल्याने महिलेचे खासगी फोटो तिच्या नणंदेला पाठवून ते व्हायरल केले.तसेच महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 6) दुपारी एक वाजताच्या सुमारास माणगाव येथे घडला.
याप्रकरणी पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जयेश बुधवंतराव (रा. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी सोबत बोलणे बंद केले. त्यावरून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या नणंदेला फिर्यादीचे अश्लील फोटो वेगवेगळ्या फोन नंबरवरून व्हायरल केले. फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.