दिघी :महिलेच्या पर्समधून पीएमपी बस प्रवासात 59 हजाराची रोकड लंपास
परांडेनगर ते दत्तनगर बस थांब्या दरम्यान दिघी येथे पीएमपी बसच्या प्रवासात एका प्रवासी महिलेच्या पर्समधून 59 हजार 200 रुपये काढून नेल्याची घटना मंगळवारी (दि. 6) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन ते चार अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला विश्रांतवाडी ते दत्तनगर दिघी या मार्गावरून पीएमपी बसने प्रवास करीत होत्या. बस प्रवासात तीन ते चार अनोळखी महिला फिर्यादिजवळ येऊन गर्दी करून थांबल्या. त्या महिलांनी ढकलाढकली करून फिर्यादी यांच्या पर्समधून 59 हजार 200 रुपये रोख रक्कम काढून चोरून नेली. दत्तनगर येथे उतरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दिघी पोलीस पुढील तपास करीत आहेत.