मावळ :रेडझोन आणि पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी हे प्रश्न लवकर सोडवले जातील : माजी आमदार बाळा भेगडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 30 मे ते 30 जून दरम्यान लोकसभा मतदारसंघा मध्ये ‘विशेष जनसंपर्क अभियान (मोदी @9) संपन्न होत असून त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, अश्विनी जगताप, एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अमोल थोरात, बाळा भेगडे आदी उपस्थित होते.
तेव्हा बोलताना भेगडे म्हणाले, रेडझोनचा प्रश्न सोडवण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू असून लवकरच रेडझोनचा प्रश्न मार्गी लागेल, तसेच पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी देण्याबाबत लवकरच योग्य निर्णय होईल.
सविस्तर माहिती देत भेगडे म्हणाले, पवना धरणातून पिंपरी-चिंचवडला पाणी मिळाले पाहिजे. या मताशी आम्ही सहमत आहोत. पण, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता दमदाटी करून कारवाई केली. विश्वासात घेतले असते तर मार्ग निघाला असता.धरण साडे 10 टीएमसीचे आहे. शिल्लकसाठा दीड टीएमसी राहतो. 1टीएमसी पाणी बाष्पीभवनात जाते असा जलसंपदा खात्याचा अहवाल आहे. धरणातील माती, दगड धोंडे यामुळे 1टीएमसी पाणीसाठा कमी केला जातो. प्रत्यक्षात साडे 9 टीएमसी पाणीसाठा केला जातो.,वापरण्यासाठी केवळ साडे 6 टीएमसी पाणी राहते. मावळ आणि पिंपरी चिंचवडचा भाग वाढत आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येकाला पाणी मिळावे हीच आमची भूमिका आहे. लवकरच याबाबत बैठक होईल आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल.
आघाडी सरकारने इंधन दर कमी केले नाही अशी टीका करताना भेगडे म्हणाले, युक्रेन आंतरराष्ट्रीय युद्धामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. केंद्राने सातत्याने दर कमी केले. परंतु, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दर कमी केले नव्हते. शिंदे-फडणवीस सरकार येताच इंधनाचे दर कमी करत जनतेला दिलासा दिला. जलजीवन योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योजक तयार झाले. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यात केंद्र सरकार यशस्वी झाले.