मराठा विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून सरकार जाणीवपूर्वक वंचित ठेवतय का?शिंदे- फडणवीस सरकारवर सुनिल गव्हाणे यांची टिका
छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) गेल्या नोव्हेंबरमध्ये परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा समाजातील पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी करण्यात आली होती.त्यासंबंधीचा
प्रस्ताव सादर केला होता. परंतु सादर केलेला हा प्रस्ताव नियोजन विभागाकडे धूळ खात पडून आहे. यावर निर्णय घ्यायला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना वेळ नाही. केवळ इव्हेंट करण्यात हे सरकार अडकले आहे, अशी टीका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी केली.
समाजकल्याण विभाग आणि इतर बहुजन कल्याण विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.त्यानुसार शिष्यवृत्ती मिळेल या अपेक्षांनी ते प्रयत्न करत आहेत.सरकारच्या कामचुकारपणामुळे मोठा फटका गरजू विद्यार्थ्यांना बसला आहे. मोठया घोषणा शासनाने करायच्या,कृती मात्र शुन्यच आहे. हजारो मराठा विद्यार्थी परदेशात उच्चशिक्षणास घेण्यास उत्सुक आहेत.
सहा महिन्यापूर्वी सारथीने प्रस्ताव शासनाच्या वित्त विभागाकडे दिला.
अजुनही त्याला कोणतेही परवानगी मिळाली नाही.
यावर्षाच्या परदेशातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. मग सारथी मान्यता, जाहिरात या बाबी कधी पूर्ण होणार?असा प्रश्न सुनिल गव्हाणे यांनी सरकारला विचारला आहे.