पुण्यातील पोलिसांना सतर्कतेचे आदेश
कोल्हापुरात सोशल मीडियावर ठेवलेल्या स्टेटसवरून झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अनेक शहरात खबरदारी घेतली जात आहे. त्यासोबतच पुण्यातल्या सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरातल्या अनेक ठिकाणांहून रुट मार्च काढण्यात आला. सोशल मीडियातील संदेशांवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्याही पोलिसांना सूचना आहेत.