छत्रपती संभाजीनगर रात्री ११ नंतर बंद!!
छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. रात्री 11 नंतर शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला आहे. सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत 11 वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.