पुणे:शब्दसुरांचा अनोखा संगम
लायन्स क्लब ऑफ पुणे, आणि स्नेंहबंध फाऊंडेशन आयोजित भारतीय संगीतावर आधारित शब्दसुरांचा अनोखा संगम, तसेच क्षितिजाच्या पलिकडे व कशी करू आळवणी या ध्वनिफितीचा प्रकाशन सोहळा नुकताच नऱ्हे येथील स्नेंहबंध हाॅल मधे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध पत्रकार स्वप्नील पोरे तर विशेष उपस्थिती
ज्येष्ठ कवी अॅड. हशम पटेल , श्रीमती लता कुलकर्णी , राधिका दिवाण होते. द्विपप्रज्वलन करून ध्वनीफितीचे प्रकाशन प्रमुख पाहुणे ,
पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सांस्कृतिक विभागाचे संचालक श्री.विनायक माने यांच्या हस्ते करण्यात आले.
अनुरव प्रकाशनच्या प्रकाशिका अनुजा कल्याणकर यांनी शाल,श्रीफळ तुळशीचे रोप देऊन स्वागत केले. स्वर-विमल संगीत सामाजिक संस्थेचे संस्थापक संगीतकार पं.रविंद्र यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साहित्यिक, कवी, राहुल भोसले यांच्या संयोजनाखाली भावरंग एक अलौकिक काव्यसंध्या हा बहारदार कवितांच्या मैफलीत स्मिता धारूरकर,अतुल राऊत,विजय जाधव,
अॅड.रामचंद्र पाचुनकर, वैशाली लांडगे,योगेश हरणे, डॉ.जनार्दन भोसले,आदी कवींनी आशयसंपन्न कविता सादर करून काव्य मैफल रंगवली. सुत्रसंचलन सौ.उज्वला वेदपाठक, कवी लक्ष्मण शिंदे, यांनी ओघवत्या भाषेत करून सोहळ्याची रंगत वाढवली.समाजसेवक बापू पोकळे सर्व कलाकारांना शुभेच्छा देण्यास उपस्थित होते.