BREAKING – हाँकी ज्युनिअर मध्ये भारताचा शानदार विजय
भारतीय हॉकी संघाने ज्युनियर महिला आशिया चषक स्पर्धेत चायनीज तैपेईवर दणदणीत विजय नोंदवला. जपानमधील काकामिगहारा शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच चायनीज तैपेईवर बाजी मारली. टीम इंडियाने पूर्वार्धात 5-0 अशी आघाडी घेतली होती, त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये 6 गोल करत विरोधी संघाचा 11-0 असा पराभव केला. या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली आहे.