फेसबुक व इंन्साग्राम वर यांना 699 रुपये द्यावे लागणार, अधिक माहितीसाठी बातमी वाचा.
मेटाने आपली व्हेरिफाइड सेवा भारतात लाँच केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटवर ब्लू टिक आणि व्हेरिफाइड बॅजसाठी शुल्क द्यावे लागणार आहे. युजर्सला हे सब्सक्रिप्शन आयओएस आणि अँड्रॉइडवर 699 रुपये प्रती महिना शुल्क भरून विकत घेता येणार आहे. मेटा व्हेरिफाइड सर्व्हिसेस अंतर्गत युजर्स सरकारी आयडीच्या माध्यमातून आपले अकाउंट व्हेरिफाय करु शकतात. ट्विटरही ब्लू टिकसाठी शुल्क आकारते.