पिंपरी विधानसभेच्या (BJP) प्रमुखपदी अमित गोरखे यांची नियुक्ती
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा प्रमुखांची घोषणा केली. भाजपने पिंपरी विधानसभेच्या (BJP) प्रमुखपदी अमित गोरखे यांची नियुक्ती केली आहे.
पिंपरी विधानसभेसाठी युवा उच्चशिक्षित चेहरा अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे. गोरखे यांचे शिक्षण MA, MBA असून त्यांचा स्वभाव शांत व संयमी आहे. त्यांची इमेज उच्च शिक्षित अशी आहे.
पिंपरी विधानसभा क्षेत्रात त्यांचा चांगला संपर्क आहे व त्याचा फायदा पक्षाला नक्की होईल. नुकतीच त्यांनी पिंपरी विधानसभा क्षेत्रात काढलेली स्वातंत्र्यवीर सावरकर यात्रा यशस्वी ठरली होती.