चीन सीमावर्ती भागात बांधत आहे गावे
चिनी सैन्य मागील काही दिवसांपासून भारतालगत विशेषतः पूर्व लडाख, सिक्कीम व अरुणाचल प्रदेशजवळील सीमावर्ती भागात गावे बांधत आहे. आता चिनने उत्तराखंडलगतच्या सीमावर्ती भागात गावे बांधणे सुरू केल्याची माहिती समोर आले आहे. उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून येते की चीन अतिशय वेगाने लष्करी पायाभूत सुविधा सीमावर्ती भागात उभारत आहे. एवढेच नाही तर चीन लडाखजवळील भागात आपले सैन्यदल बळकट करत आहे.