शरद पवारांबाबतचे ‘ते’ वृत्त खोटे
छत्रपती संभाजीनगर नावाऐवजी मी औरंगाबाद म्हणणार, असे शरद पवार म्हणाल्याचे वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. पण हे वृत्त साफ खोटे असल्याचे समोर आले. या बातमीबद्दल संबंधित वृत्तवाहिनीने स्पष्टीकरण दिले. आता त्या वृत्तवाहिनीविरोधात कारवाई करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. दरम्यान, बोलताना शरद पवारांकडून चूकून औरंगाबाद हा उल्लेख झाला त्यानंतर छत्रपती संभाजीनगर म्हणत त्यांनी चूक दुरूस्त केली.