यंदा भारतात होणार ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा
यंदा भारताला 71 वा ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार असल्याचे मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा आणि सीईओ ज्युलिया मोर्ली यांनी सांगितले. ही स्पर्धा गोव्यामध्ये होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मिस वर्ल्ड स्पर्धेत मिस इंडिया वर्ल्ड 2022 ची विजेती सिनी शेट्टी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. भारतात 1996 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा झाली होती.