September 23, 2023
PC News24
कलापिंपरी चिंचवड

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तारखांचे आरक्षण आणि प्रस्तावित भाडेवाढीचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ प्रस्तावित केली असून तारखांचे वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जुलै 2023 पासून याची अंमलबजावणी सुरू होईल,असे निवेदनात सांगण्यात आले आहे.

नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. नाटके, बालनाट्य, गाण्यांचे कार्यक्रम, एकांकिका यासाठी अपेक्षित तारखा मिळणे अवघड होऊन बसेल. यात आयोजकांचे नुकसान होण्याबरोबरच रसिक प्रेक्षकांचाही हिरमोड होईल.

प्रयोगांच्या तारखा निश्चित करताना इतरही अनेक गोष्टी जमवून आणाव्या लागतात. अशा वेळी नाट्यगृहाची तारीख न मिळाल्यास तथा मिळालेली तारीख हातातून गेल्यास अनेकांची गैरसोय होते आणि तो दिवस व्यर्थ ठरल्याने आर्थिक नुकसानही होण्याची भीती आहे.तसेच कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल.नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ती वाढ अवाजवी असू नये.नाट्य व्यावसायिकांना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना परवडणारे दर असावेत. नाट्प्रयोग होण्यापूर्वी तीन महिने अगोदर भाडेदर, अनामत रक्कम आदी रक्कम भरण्याचे प्रस्तावित असून ते शक्य होणार नाही. तसे होणे कठीण आहे. या निर्णयाचा आपण फेरविचार करावा. नाट्यगृहांच्या तारखा आरक्षित करताना शनिवार आणि रविवारी येणाऱ्या तारखा प्राधान्याने नाटकांसाठी राखून ठेवाव्यात. या प्रकारांना आळा बसावा. नाट्यगृहांमध्ये नियुक्त केले जाणारे अधिकारी जाणकार असावेत. किमान या क्षेत्राविषयी त्यांना पुरेशी माहिती असावी.

Related posts

24 तासांत वीजपुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा,आमदार महेश लांडगे यांचा महवितरणाला इशारा.

pcnews24

शाळेच्या बांधकामामुळे हॉस्पिटलच्या रुग्णांना उचलून नेण्याची वेळ,काळभोर नगर रस्त्याची दुरावस्था.

pcnews24

सध्याच्या राजकीय,सामाजिक परिस्थितीत ‘विचार शून्यता’ ही मोठी समस्या – नितीन गडकरी.

pcnews24

पर्यावरण प्रेमींसाठी खास पर्वणी…

pcnews24

इंडियन स्वच्छता लीग 2.0 का क्षेत्रीय आरोग्य विभाग.

pcnews24

निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार कंटेनर पार्क केला आणि पुढे घडला अनर्थ

pcnews24

Leave a Comment