चिंचवड :अज्ञाताच्या फोनने ज्येष्ठ नागरिकाचे बँकेतून दिड लाख लंपास
ज्येष्ठ नागरिकाला दि.15 ते 16मार्च 2023 या कालावधीत बँकेतून बोलत असल्याचे सांगून तब्बल दिड लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. चिंचवडगाव येथे हा प्रकार घडला आहे.
शिवाजी रामभाऊ काठे (वय 70 रा.चिंचवडगाव) यांनी गुरुवारी (दि.8) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.