March 1, 2024
PC News24
राजकारण

पिंपरी,चिंचवड,भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात घेणार मोठी झेप – बाळासाहेब थोरात

पिंपरी,चिंचवड,भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात घेणार मोठी झेप – बाळासाहेब थोरात

पिंपरी चिंचवडला उभे करण्यात काँग्रेसचा मोठा वाटा असून काँग्रेसचा इथे मोठा दबदबा होता.
ते दिवस पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केल्या.
भाजपच्या भरत वाल्हेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यां सह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.त्या प्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसला मोठी परंपरा आहे. अगदी संतांचे विचार हेच काँग्रेसचे विचार आहेत. पिंपरी, चिंचवड व भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठी झेप घ्यायची आहे. काही महिन्यातच लोकसभा निवडणुका येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसला सत्तेवर बसविण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागले पाहिजे. त्यासाठी विविध सेलच्या माध्यमातून एकत्र येऊन नागरिकांमध्ये काँग्रेसची विचारधारा घेऊन जाण्याची आवश्यकता आहे.

भरत वाल्हेकर यांनी सांगितले की काँग्रेस हा सर्व विचारधारांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत शहर काँग्रेस विविध मुद्दे घेऊन मतदारांपुढे जाईल. काँग्रेस नेतृत्वाने विश्वास दाखविल्यानेच काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. हा विश्वास सार्थ ठरविणार आहे.
कैलास कदम म्हणाले, की इंटकच्या माध्यमातून मोठे जाळे निर्माण झाले आहे. शहर काँग्रेसमध्ये पूर्वीचे दिवस आणण्यासाठी कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रयत्न सुरू आहेत.कर्नाटक निकालाने काँग्रेसमध्ये ऊर्जा निर्माण झाली असून, येत्या काही महिन्यात विविध पक्षातील चेहरे काँग्रेस मध्ये दिसतील.

सोनल पटेल, माजी आमदार मोहन जोशी, पृथ्वीराज साठे,माजी महापौर कविचंद भाट, श्यामलाताई सोनवणे, निगारताई बारस्कर, अशोक मोरे, अभिमन्यू दहितुले, संग्राम तावडे, नरेंद्र बनसोडे, सायली नडे, विश्वास गजरमल, विश्वनाथ जगताप, विठ्ठल शिंदे, बाबु नायर, उमेश खंदार, माउली मलशेट्टी, कौस्तुभ नवले, विजय ओव्हाळ, भीकू खेनट, माधवराव मोहिते, इकबाल शेख उपस्थित होते.

Related posts

ब्रेकिंग न्यूज – मी अध्यक्षपदावरून निवृत्त होणार शरद पवार (व्हिडिओ सह)

pcnews24

शिष्यवृत्तीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करण्याची मागणी-राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

pcnews24

‘शरद पवारांनी अजित पवारांना बोल्ड केले’: देवेंद्र फडणवीस 

pcnews24

N.D.A vs I.N.D.I.A;दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत मंजूर.

pcnews24

अजित दादांकडून गिरीश महाजन यांच्या फिटनेसचं कौतुक;साठीच्या पुढे गेले पण….

pcnews24

खंडणीची धमकी देणाऱ्यास पोलिसांकडून अटक, आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, मनसेचे नेते वसंत मोरे अशा राजकीय नेत्यांना केले होते टार्गेट.

pcnews24

Leave a Comment