शिवाली परब दिसणार नवीन चित्रपटात
सुप्रसिद्ध कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यामधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शिवाली परब लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे. शिवालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. शिवाली ‘उलगुलान’ या नव्या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली असून 2024 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.