राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा,अजित पवार कार्यक्रम संपताच गैरहजर.
‘ माझ्यावर पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्या साठी मी कटिबद्ध आहे..कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पक्षसंघटनेचे आभार मानले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची आज निवड करण्यात आली आहे. याबद्दल सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे.
‘अजित पवारांनीच दिला प्रस्ताव’
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळेंच्या नावाची घोषणा शरद पवारांनी केली. यानंतर अजित पवार कार्यक्रम संपताच निघून गेले. यानंतर विद्या चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला. ‘शरद पवारांनी दिलेला राजीनामा मागे घेतला नाही किंवा ऐकलेच नाहीतर काय करायचे? यावर,तेव्हा अजित पवारांनीच सुप्रियांना कार्यकारी अध्यक्ष बनवावे, असा प्रस्ताव दिला होता,’ असा खुलासा विद्या चव्हाण यांनी केला.
सुप्रिया सुळेंच्या निवडीबाबत अजित पवार म्हणाले…’शरद पवारांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. यावर अजित पवारांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. निवड करण्यात आलेल्या नेत्यांचे अभिनंदन केले असून शरद पवारांनी टाकलेला विश्वास हे नेते सार्थ ठरवतील.’हृदयात महाराष्ट्र, नजरे समोर राष्ट्र’ हा विचार ठेऊन पक्ष देश आणि राज्यासाठी मोलाचे योगदान देईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.