प्रभाग क्र.२ बोऱ्हाडेवाडी येथील सुसज्ज शाळेचा लोकार्पण सोहळा.
महापालिका शाळांत शिकणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थांना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा,मिळाव्यात यासाठी शहरात काही इमारतींचे नूतनीकरण व नवीन उभारणी सुरू आहे म्हणून प्रभाग क्र.२ बोऱ्हाडेवाडी येथे गायरान जागेतील आरक्षित जागेत शाळेची इमारत उभारण्यात आली आहे. अनेक वैशिष्ट्ये व सोयी सुविधांनी युक्त अशी ही इमारत आहे.शाळेत एकूण २७ वर्गखोल्या,
सुसज्ज हॉल,संगणक कार्यशाळा,खेळाचे मैदान,उपलब्ध आहे.
मोशी,बोऱ्हाडे वाडी येथील विद्यार्थांना याचा लाभ मिळणार आहे.या संकुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.