अमित शाहांचे ठाकरेंना चार सवाल
नांदेड येथील सभेतून गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना चार प्रश्न केले आहेत. उद्धव जी, आम्ही तिहेरी तलाक रद्द केला त्यावर तुम्ही सहमत आहात की नाही ?, राम मंदिराच्या बांधकामाशी तुम्ही सहमत आहात की नाही?, तुम्ही स्पष्ट करा की तुम्हाला कॉमन सिव्हिल कोड हवा आहे की नाही?, तुम्ही सांगा मुस्लिम आरक्षण पाहिजे की नाही?, असे सवाल शाह यांनी केले. आता यावर ठाकरे काय उत्तर देणार याकडे लक्ष असेल.