संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा 338 वा पालखी सोहळा भक्ती भावामध्ये संपन्न झाला. तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. पालखीचा आजचा पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. टाळ- मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल होत आहेत. ते पालखीसोबत पंढरीकडे पायी प्रस्थान करणार आहेत.