गुंडा विरोधी पथकातील पोलिसांना टोळक्याकडून मारहाण
गुंडा विरोधी पथकातील रात्रपाळीवर असणाऱ्या पोलिसांना ओटास्कीम निगडी येथील टोळक्या कडून मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.9) पहाटे घडला.
याप्रकरणी भरत ज्ञानोबा थोरात (वय 40), युवराज रावण कसबे (वय 57), विशाल रतीलाल सागर (वय 22), तुषार तुकाराम उदगिरे (वय 23), आप्पासाहेब अतुल कदम (वय 25), सुरज अजगर चौधरी (वय 22), अजय चंद्रकात कंट्रोलु (वय 45) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गंगाधर चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व इतर पोलीस कर्मचारी रात्र गस्तीवर असताना आरोपी यांनी बेकायदेशीरपणे सरकारी कामात अडथळा निर्माण करत पोलिसांनाच थेट शिवीगाळ व मारहाण केली. यावरून पोलिसांनी आरोपीना अटक केली असून त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्ह दाखल केला आहे.