नेहरूनगर येथील सराईत गुन्हेगाराचा अज्ञातांकडून खून
नेहरूनगर येथे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाला. शनिवारी (दि.10) सकाळी नेहरूनगर येथील स्टेडियमजवळ ही घटना उघडकीस आली.
बल्लू उर्फ आदर्श ठाकूर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरूनगर येथील स्टेडियम जवळ अज्ञातांनी ठाकूर याला लाकडी दांडक्याने मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला. ठाकूर याच्यावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तो पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.