AI मध्ये करिअर करणाऱ्यांसाठी गुडन्यूज
लवकरच अनेक क्षेत्रात आता आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (AI) प्रवेश करत आहे. त्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहे. नवोदित तरुणांना यासाठी प्रशिक्षित करता यावे, या उद्देशाने मायक्रोसॉफ्टने नवीन एआय कोर्सेस सुरु केले आहेत. 12 आठवड्यांसाठी विविध 24 कोर्सेस सुरु आहेत. तुम्ही हे मोफत शिकू शकता. मायक्रोसॉफ्ट क्लाऊडवर याविषयी तुम्हा सविस्तर माहिती घेता येणार आहे.