‘सायकल चालवा-पर्यावरण वाचवा‘ जी – 20 परिषदेचे निमित्त
पुणेकरांच्या उत्तम प्रतिसादात महापालिकेच्या सायकल क्लबतर्फे शनिवारी पर्यावरण सायकल फेरी घेण्यात आली.
पुणे शहरात होणाऱ्या जी- 20 परिषदेच्या वातावरण निर्मितीसाठी हा अनोखा उपक्रम घेण्यात आला. सुमारे दोन हजारांहून जास्त पुरुष-महिलांनी भाग यात सहभाग घेतला.यावेळी ‘सायकल चालवा-
पर्यावरण वाचवा‘, ‘स्वच्छ पुणे-सुंदर पुणे‘ अशा घोषणाही देण्यात आल्या. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी महापालिका भवन येथे सायकल फेरीला निशाण दाखविले.
पालिका भवन, मॉडर्न कॅफे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, अभिनव महाविद्यालय चौक, बाजीराव रस्ता, शनिवारवाडामार्गे परत पालिका भवन असा सायकल फेरीचा मार्ग होता.
क्रीडा विभागाच्या उपायुक्त चेतना केरुरे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, अधीक्षक अभियंता राजेंद्र तांबे, सुरक्षा अधिकारी, राकेश विटकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी व नेहा भावसार यांनी सायकल फेरीचे नेतृत्व केले.