बिपरजॉय चक्रीवादळाने दिली मॉन्सूनला गती,मान्सून होणार महाराष्ट्रात दाखल
केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे, राज्यातील काही भागात त्यापूर्वीच मान्सून पूर्व पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली.पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे.अरबी समुद्रातील “बिपरजॉय” चक्रीवादळाने मॉन्सूनला गती दिली आहे.
राज्यातील हिंगोली, नंदूरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली.