ठाकरे सोडले तर महाविकास आघाडीमधील…
प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबाबत मोठे विधान केले आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे सोडले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष विश्वासार्ह नाहीत असे ते म्हणाले आहेत. लातूरमध्ये ते बोलत होते. आम्ही त्यांच्याबरोबर जाणार होतो, मात्र जागावाटपात किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट होत नाही, असेही ते म्हणाले. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणातील पार्टीचा महाराष्ट्रात शिरकाव होत असल्याचंही ते म्हणाले.