भारत फायनल जिंकला… ट्रॉफीही जिंकली
भारतीय ज्युनिअर महिला हॉकी संघाने ज्युनिअर एशिया कप 2023 च्या फायनलमध्ये शानदार विजय मिळवला आहे. भारतीय संघाने दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. भारताने 2-1 असा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले. भारताने पहिल्यांदाच आशिया कप जिंकण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे आशिया कपच्या या मोसमात भारताने एकही सामना गमावला नाही.