रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांना भाजप नेते राम शिंदेंनी जोरदार धक्का दिला आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदी भाजपच्या उमेदवारांची वर्णी लागली. समितीच्या निवडणूकीत दोन्ही गटाचे प्रत्येकी 9 उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे सभापती, उपसभापती पद कोणाकडे जाणार याची उत्सुकता होती. यामध्ये राम शिंदेंनी मैदान मारले. सभापतीपदी काका तपकिरे आणि उपसभापतीपदी अभय पाटील यांची निवड करण्यात आली.